28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्यापुण्यात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

पुण्यात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही. पुण्यात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूम समोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यावसायिकावर स्विगीचा ड्रेस परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर स्विगीसारखे वस्त्र परिधान करून हेल्मेट घातले होते. त्या दोघांनी पिस्टल काढून दोन वेळा फायर करण्याचा प्रयत्न केला मात्र फायर न झाल्याने दोन आरोपींनी पुढे पळ काढला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून शिवाजीनगर पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR