भायखळा : भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी त्यांची भायखळा येथील महिला कारागृहातून ६ वर्षांनी सुटका झाली.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ४ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने आरोपी शोमा सेन यांना जामीन मंजूर केला होता प्रा. सेन यांच्यावर युएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
एनआयएने पुराव्या अभावी कारवाई केल्याचा आरोप जामीन अर्जात करत जामीन मंजूर व्हावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. २०१८ पासून शोमा सेन या मुंबईच्या भायखळा येथील महिला तुरुंगात न्यायालयातील कोठडीत आहेत
भीमा कोरेगावर-एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याचा आणि भीमा कोरेगावर ंिहसाचारात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी नागपूर विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक शोमा सेन यांच्यासह १४ आरोपीवर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल झाला होता.