बीड : बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे यांनी स्पष्ट केले आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक लढवावी असा जनतेचाच होरा होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.