नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आज रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्स आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वातील सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आले आहेत. दिल्लीच्या होमग्राऊंडवर ही मॅच होत असून रिषभ पंतने टॉस जिंकला आहे. अरुण जेटली स्टेडियमवरील आजची पहिली मॅच आहे. दिल्लीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंतचा हा निर्णय दिल्लीला महागात पडला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई केली. ट्रेविस हेडने १६ बॉलमध्ये अर्धशतक केले. त्याला अभिषेक शर्माने देखील साथ दिली. सनरायजर्स हैदराबादने सहा ओव्हरमध्ये १२५ धावा केल्या.
सनरायजर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने केली. सनरायजर्स हैदराबादने आक्रमक सुरुवात केली असून पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी १९ धावा केल्या होत्या. ट्रेविस हेडने खलील अहमदच्या पहिल्या ओव्हरमध्ये १५ धावा काढल्या. तर अभिषेक शर्माने चार धावा केल्या होत्या. यानंतर ट्रेविस हेडने गियर बदलला. ट्रेविस हेडने पुन्हा एकदा बॉलर्सला धु धु धुतले आहे. ट्रेविस हेडने आज पुन्हा एकदा बॉलर्सची धुलाई केली. त्याने १६ बॉलमध्येच अर्धशतक केले. ट्रेविस हेडने पॉवरप्लेमध्ये ५ सिक्स आणि ११ चौकार मारत २६ बॉलमध्ये ८४ धावा केल्या.