लातूर : नेहरू नगर तांडा येथे कार व टेम्पोचा भीषण अपघात झाल्याचे पाहून ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज विलासराव देशमुख हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले. स्वत:च्या वाहनातून जखमींना लातूरमधील रुग्णालयात पोचवले. त्यामुळे जखमी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळू शकले.
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील एका समारंभासाठी आमदार धिरज देशमुख रविवारी (ता. २१) गेले होते. हा समारंभ संपल्यानंतर ते लातूरकडे परतत असताना नेहरू नगर तांडा येथे हा अपघात झाला. यावेळी आपली वाहने थांबवून आमदार धिरज देशमुख यांनी जखमींना तत्काळ मदत केली.