24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत जरांगेंनी घेतली सभा

पहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत जरांगेंनी घेतली सभा

करमाळा : आज पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली. काल (बुधवारी) संध्याकाळी ७ वाजता होणा-या सभेला पोहोचण्यासाठी जरांगे यांना पहाटेचे चार वाजले. तरी देखील थंडीमध्ये कुडकुडत हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली.
मनोज जरांगे यांच्या सभेसाठी काल दुपारपासून मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरुवात झाली होती. अनेक भागातून मराठा बांधव जमायला सुरुवात झाली होती. करमाळा येथील वांगी हे गाव उजनीच्या बॅक वॉटरवरती आहे. कडाक्याची थंडी या भागामध्ये जाणवते. इंदापूर येथील लोकही या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखाच्या आसपास लोक जमले होते. मात्र, जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.

त्यांना पोहोचायला उशीर झाला मात्र, येथे जमलेल्यांनी मनोज जरांगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर ४ वाजता सभा पार पडली. ४ ते ५ मिनिटे ते सभेत बोलले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहील. तुमचं जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले.

जरांगे-पाटील यांच्या उद्या सांगली जिल्ह्यात तीन सभा
मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे लक्ष वेधून घेणारे मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी (ता. १७) सांगली जिल्ह्यात तीन सभा घेणार आहेत. मराठवाड्यात त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांचा पश्­िचम महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे. त्यांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी राज्य सरकारला दुस-यांदा मुदतवाढ देताना २४ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला निर्णयासाठी मुदत दिली आहे. मनोज जरांगे-पाटील यांचा हा तिस-या टप्प्यातील दौरा आहे.

शुक्रवारी ते खानापूर तालुक्यातील मायणीमार्गे प्रवेश करतील. सकाळी साडेआठला विटा येथे पहिली सभा होईल. त्यानंतर नियोजित वेळेनुसार त्यांचे सकाळी ११ वाजता सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील मध्यवर्ती तरुण भारत मैदानावर सभा होईल. त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कोल्हापूरकडे रवाना होतील. संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे सभा करून ते क-हाडला रवाना होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR