16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयअश्लील पोस्ट लाईक करणे अपराध नाही

अश्लील पोस्ट लाईक करणे अपराध नाही

अलाहाबाद : फेसबुक किंवा ट्विटर एक्सवर यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील पोस्ट शेअर करणे गुन्हा आहे, पोस्ट लाईक करणे हा गुन्हा नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पोस्ट लाईक करणे हे पोस्ट प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासारखे नाही, त्यामुळे आयटी कायद्याअंतर्गत हे कृत्य दंडनीय नाही असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.

एका प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, फेसबुक किंवा एक्सवर अश्लील पोस्ट शेअर करणे गुन्हा आहे. न्यायमूर्ती अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या एकल खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हा निर्वाळा दिला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत शिक्षा फक्त पोस्ट लाइक करणे हा पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे, यासारखा गुन्हा नाही, त्यामुळे या प्रकरणी शिक्षा होऊ शकत नाही.

या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या विरोधात आरोप होता की, त्याने सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह आणि उत्तेजक संदेश पोस्ट केले होते. ज्यामुळे मुस्लिम समाजातील सुमारे ६००-७०० लोकांनी परवानगीशिवाय मिरवणुकीची व्यवस्था केली, ज्यामुळे शांतता आणि सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला. सुनावणीदरम्यान, या प्रकरणाच्या तपास अधिका-यांनी काझमीने जमाव जमवण्याचे आवाहन करणा-या सोशल मीडियावरील पोस्ट लाइक केल्याच्या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवला. पण काझमीने स्वत: पोस्ट केल्याचा किंवा पोस्ट शेअर केल्याचा पुरावा पोलिसांना सादर करता आला नाही.

शेअर किंवा रीपोस्ट करणे मात्र गुन्हा
सोशल मीडियावर एखादी आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. अर्थात, अशा प्रकारची पोस्ट शेअर किंवा रिपोस्ट करणे मात्र माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत दंडात्मक कृत्य असणार आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले. आर्ग्यातील मोहम्मद इम्रान काझी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कोर्टाने हे स्पष्टीकरण दिले. या व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक केली होती. त्यामुळे त्याच्यावर आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर कलमांखाली फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने निर्णय देत ही कारवाई रद्द केली.

अश्लील पोस्ट प्रकाशन गुन्हा नाही
या प्रकरणी सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले की, अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा आहे. एखादी पोस्ट किंवा संदेश जेव्हा पोस्ट केला जातो, तेव्हा प्रकाशित केला जातो असे म्हटले जाऊ शकते आणि पोस्ट किंवा संदेश शेअर किंवा रीट्विट केल्यावर प्रसारित केला जाऊ शकतो. खंडपीठाने पुढे सांगितले की, याचिकाकर्ता फरहान उस्मानची पोस्ट लाईक केली आहे, पण पोस्ट लाइक करणे हे पोस्ट प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासारखा गुन्हा नाही, म्हणून आयटी कलम ६७ लागू होणार नाही. कोणत्याही पोस्टला फक्त लाईक करणे अपराध नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR