35.5 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइस्राईलच्या हवाई हल्ल्यात ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू

इस्राईलच्या हवाई हल्ल्यात ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू

जेरुसलेम : मध्य गाझा येथे बुधवारी रात्री इस्राईलने केलेल्या हवाई बॉम्बफेकीत पन्नास पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून २० हुन अधिक जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीच्या मध्यभागी असलेल्या साब्रावर हल्ला करून एका मशिदीचे नुकसान केले. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गाझामधील नुसेरात निर्वासित शिबिरातील मलेशियन शाळेवर झालेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत तर दक्षिण गाझामधील खान युनिस येथे झालेल्या बॉम्बस्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

इस्रायली लष्कराने या दाव्यांवर भाष्य केलेले नाही परंतु त्यांनी हमासच्या स्थानांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. सोमवारी, हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या गाझावर इस्रायली बॉम्बफेकीत ११,२४० लोक मारले गेले आहेत, ज्यात ४,६३० मुलांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR