36 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeराष्ट्रीयसैन्य दलाच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला, ५ जवान जखमी

सैन्य दलाच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला, ५ जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाले असून बसमधून हे हवाई दलाचे जवान जात असल्याची माहिती आहे.

देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सीमारेषेवर सैन्य दलाकडून आणि देशात सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट व कडक बंदोबस्त तैनात आहे. मात्र, दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्याने सीमारेषेवरील पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहिम सुरू केली आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली आहे. शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आतमधील इतरही सर्व वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत. या हल्ल्यात ५ लष्करी जवान जखमी झाले असून त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील शोधमोहिम सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR