36.4 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रप्रेयसी बोलत नसल्याने प्रियकराने दुकानच पेटवले

प्रेयसी बोलत नसल्याने प्रियकराने दुकानच पेटवले

नागपूर : नागपुरात सध्या एका घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. कारण, प्रेमाच्या नात्यात असणा-या मतभेदामुळे एका प्रियकराने प्रेयसी जिथे काम करत होती त्या कपड्याच्या दुकानाला आग लावली. त्याच्या या कृतीने अनेकांना फटका बसला आहे.

दरम्यान, नागपुरात प्रेयसीने ब्रेकअप करून, बोलणं बंद केल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसी काम करत असलेल्या दुकानाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत चट्टे असे दुकानाला आग लावणा-या कथित प्रेमवीराचे नाव आहे. आठवडाभराच्या तपासानंतर तहसील पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपीला अटक केली आहे.

शहरातील व्यापारी पेठ इतवारी येथील बोहरा मशीद गल्ली परिसरामध्ये रितेश मखिजा यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. रितेश ३० एप्रिलला रात्री दुकान बंद करून घरी परतले होते. १ मे रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना दुकानातून धूर येत असल्याचे सांगत एका गृहस्थांचा फोन आला. त्यानंतर रितेश यांनी त्वरेने दुकानाकडे धाव घेतली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत दुकानात लागलेली आग विझविली. मात्र या आगीत रितेश यांच्या दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते, या घटनेमध्ये त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR