39.1 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा धोका वाढला

केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा धोका वाढला

नवी दिल्ली: केरळच्या आरोग्य विभागाने केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. मलप्पुरम, कोझिकोड आणि त्रिशूर जिल्ह्यात वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

गेल्या आठवड्यात केरळमध्ये आरोग्य विभागाची उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता आदी कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. याशिवाय जिल्हा वैद्यकीय अधिका-यांना त्यांच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच जिल्हा प्रशासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत मिळून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा वेक्टर कंट्रोल युनिटने अनेक ठिकाणांहून नमुने गोळा केले असून, सर्व नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर आरोग्य विभागाने केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये नुकताच अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की,वेस्ट नाईल तापाचा प्रकार डेंग्यूसारखेच आहे. सध्या काळजी करण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. अद्याप हॉट स्पॉट नाहीत. कोझिकोडचे जिल्हाधिकारी स्नेहिल कुमार सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत फक्त पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी चार बरे झाले आहेत आणि एकावर उपचार सुरू आहेत.

वेस्ट नाईल ताप म्हणजे काय?

वेस्ट नाईल ताप हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरतो. १९३७ मध्ये युगांडामध्ये हे पहिल्यांदा आढळून आले. २०११ मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा ताप आढळून आला होता आणि मलप्पुरममधील एका सहा वर्षांच्या मुलाचा २०१९ मध्ये तापामुळे मृत्यू झाला होता. मे ९ मध्ये, त्रिशूर जिल्ह्यात ४७ वर्षीय व्यक्तीचा तापाने मृत्यू झाला होता. वेस्ट नाईल विषाणूमुळे घातक न्यूरोलॉजिकल रोग होऊ शकतात. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, हा प्रामुख्याने संक्रमित डास चावल्याने पसरतो.

अशा प्रकारे स्वत:चे रक्षण करा

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, शरीर पूर्णपणे झाकणारे कपडे घालणे, मच्छरदाणी आणि रिपेलेंट्स वापरणे. तापेचरची लक्षणे दिसत असल्यास, डॉक्टरांकडून उपचार घ्या. आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, असा सल्ला आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR