18.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeराष्ट्रीयचिरंजीवीला पद्मविभूषण तर होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण

चिरंजीवीला पद्मविभूषण तर होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नागरी गुंतवणूक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांना पद्मविभूषण प्रदान केले. या व्यतिरीक्त अनेक मान्यवरांना आज पुरस्कार देण्यात आले. कला क्षेत्रातील कोनिदला चिरंजीवी यांना देखील पद्मविभूषण प्रदान केले.

तसेच माध्यमातील दिग्गज होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता या क्षेत्रातील पुरस्कार मिळाला आहे. सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात सत्यब्रत मुखर्जी (मरणोत्तर) यांना पद्मभूषण प्रदान केले. दिवंगत सत्यब्रत मुखर्जी यांचे पुत्र सुमेंद्र नाथ मुखर्जी यांना हा पुरस्कार मिळाला. शिल्पकार ए वेलू आनंदा चारी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. हिंदुस्तानी शास्त्रीय गायक सोम दत्त बट्टू यांना पद्मश्री, सत्यनारायण बेलेरी यांना कृषी क्षेत्रातील पद्मश्री प्रदान केले. क्रीडा क्षेत्रातील जोश्ना चिनप्पा यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला.

अंदमान आणि निकोबार बेटांचे शेतकरी, के चेल्लम्मल यांना कृषी क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील श्रीधर माकम कृष्णमूर्ती यांना पद्मश्री प्रदान केले. तसेच जॉर्डन लेपचा यांना कला क्षेत्रातील योगदानामुळे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR