नागपूर : भंडारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान नागपूर इथं मृत्यू झाल्याची घटना घडली. महिला बंदीवानाच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत. मीनाक्षी संजय वाडीचार (४०) असे या महिला बंदीवानाचे नाव आहे.
मीनाक्षी संजय वाडीचार या भंडारा जिल्हा कारागृहात असताना त्यांची ३ फेब्रुवारीला अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ८ फेब्रुवारीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले.
नागपूरमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. न्यायालयीन महिला बंदीवानाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश भंडारा जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. भंडारा उपविभागीय अधिकारी यांना या चौकशीचे आदेश दिले आहे.