17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeअंतरराष्ट्रीयरुग्णालयात गोळीबार; संशयितांसह २ जणांचा मृत्यू

रुग्णालयात गोळीबार; संशयितांसह २ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील मनोरुग्णालयात एका व्यक्तीने गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात संशयित ठार झाला आहे. हा हल्ला रुग्णालयाच्या लॉबीपुरता मर्यादित असल्याचेही पोलिसांनी सांगितले. राज्य पोलीस कर्नल मार्क हॉल यांनी सांगितले की संशयिताने कॉन्कॉर्डमधील न्यू हॅम्पशायर रुग्णालयात प्रवेश केला आणि लॉबीमध्ये एका व्यक्तीवर गोळी झाडली. शूटर किंवा पीडित व्यक्तीची ओळख पटली नाही. जनतेला कोणताही धोका नाही आणि रूग्ण किंवा रूग्णालयातील कर्मचार्‍यांना कोणताही धोका नाही, असे ते म्हणाले.

न्यू हॅम्पशायरमधील हे १८५ खाटांचे रुग्णालय आहे. गंभीर मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केला जातो. अशा परिस्थितीत गोळीबार करणाऱ्याचा हेतू काय होता हे समजण्यापलीकडचे आहे. तसेच अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना चिंताजनक आहेत. अमेरिका असा देश आहे की, जिथे माणसांपेक्षा बंदुका जास्त आहेत. बंदुकांच्या विक्रीबाबत कडक नियम बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी विरोध झाला. अनेक निवडणुकांमध्ये शस्त्र बंदीचा मुद्दाही उपस्थित होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR