38.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात चोख सुरक्षा व्यवस्था

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात चोख सुरक्षा व्यवस्था

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक-२०२३ चा अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला पोहोचले आहेत. दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वर्णन ‘वर्ल्ड टेरर कप’ची फायनल असे केले होते. पन्नूने क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी एअर इंडियाच्या विमानावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी अहमदाबादमध्ये तळ ठोकला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘सिख फॉर जस्टिस’ला (एसएफजे) दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही हा सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आता ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान जमिनीपासून आकाशापर्यंत सुरक्षा सुनिश्चित केली जात आहे. देशातील अर्धा डझनहून अधिक विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रवाशांची दुहेरी तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने विमानतळांवर संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूंवर लक्ष ठेवले जात आहे.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंतिम सामन्यादरम्यान सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करता येणार नाही. ही धमकी कोणी दिली आणि त्याचे जमिनीवर किती नेटवर्क आहे हे सुरक्षा यंत्रणांना माहीत आहे. भारताचे पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान यांच्यासह अनेक सेलिब्रेटी अहमदाबादला देश-विदेशातून पोहोचणार असल्याने या सामन्याला चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमभोवती अनेक टप्प्यात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. तेथे एअर शोही होणार असल्याने क्षेपणास्त्रविरोधी आणि ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR