21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeधाराशिव...अखेर माजी खा. रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

…अखेर माजी खा. रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारादरम्यान दि. ५ मे रोजी उमरगा येथील प्रचार सभेत धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. याबाबत धाराशिव जिल्ह्यातील परंडा, ढोकी, यासह विविध पोलीस ठाण्यात तसेच अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्याकडे माजी खा. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली होती. अखेर मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेऊन माजी. खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दि. ११ मे रोजी मसूद इस्माईल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा येथील प्रचार सभेत माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाची दाढी व मौलवी विरोधात वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. माजी खा. गायकवाड यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, यासाठी जिल्हाभरातून पोलीस प्रशासन विभागाकडे निवेदन देण्यात येत होते. परंडा, ढोकी पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी कारवाई करावी, म्हणून निवेदन दिले. तसेच धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांना देखील निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये मसूद शेख यांच्या तक्रारीवरून दि. ११ मे रोजी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम (ए) ५००, ५०१, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR