पुणे : भावाच्या अन्त्यदर्शनाला गेलेल्या काँग्रेस नेत्या आणि पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे त्रिभुवन कुटुंबावर शोककळा पसरली. भावाच्या अन्त्यदर्शनावेळी त्या रडत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रजनी त्रिभुवन २००४ ते २००६ पर्यंत पुण्याच्या महापौर होत्या. याकाळात त्यांनी अनेक लोकोपयोगी आणि धाडशी निर्णय घेतले होते. आपल्या कामाची पद्धत आणि दूरदृष्टीने त्यांनी पुणेकरांचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते.
काँग्रेस पक्षाने दिलेल्या विविध जबाबदा-या त्यांनी उत्तमरीत्या पार पाडल्या होत्या. शहरातील समस्या सोडवण्यासाठी पुण्यातील माजी महापौरांनी एक संघटना स्थापन केली होती, त्यातही रजनी यांचा समावेश होता.