जयपूर : पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन तब्बल पाच पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात घडली असून या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिस जवान असलेली गाडी ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. सगळे जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जात होते. मागच्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये अपघातांच प्रमाण वाढलेले आहे. कितीही प्रयत्न केले तरी अपघात थांबत नाहीत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांच्या सभेसाठी ड्यूटी लागल्याने नागौर जिल्ह्यातील खिंवसर ठाण्याचे पोलिस कर्मचारी गाडीमधून एकत्र निघाले होती. नागौरनंतर चुरु जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अपघात घडला. चुरूतल्या तारानगर येथे रविवारी पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या सभेसाठी पोलिस निघाले होते. दुर्दैवाने त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.