टेंभूर्णी : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातही अशीच एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. उजनी धरणात बोट उलटून चार जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेल्या सोसाट्याच्या वा-याने ही बोट उलटली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील मार्गावर वाहतूक करणारी ही लोंज (बोट) आहे. या बोटीतील एकजण पोहत बाहेर आल्याने ही घटना समोर आली असून बोटीसह इतरांचा शोध घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.