लातूर : प्रतिनिधी
सर्वसामान्यांचा गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची लातूरच्या बाजारात आवक वाढली आहे. जनुकीय बदल करून दाखल झालेल्या सीताफळांसोबत गावरान सिताफळ बाजारात विक्रीसाठी ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. गेल्या दोन महीन्यापासून सीताफळांची आवक बाजारात सुरू झाली आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या कडेला विविध ठिकाणी मोठया प्रमाणात विक्रे ते बसलेले दिसून येत आहेत.
सीताफळाचे दर महाग असले तरी हंगामी व पौष्टिक फळ म्हणून आवडीने ते खाल्ले जातात. त्यामुळे ग्राहकांनी सीताफळांना विशेष मागणी असल्याची फळ विक्रेत्यांनी सागीतले आहे. गोर गरिबांचा सुकामेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची आवक बाजारात मोठया प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या बाजारात सीताफळासाठी १०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून सीताफळ ओळखले जाते.
सीताफळाचा हंगाम जून ते जानेवारी दरम्यान तीन बहरात असतो. जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. जून ते ऑक्टोबरचा बहर सध्या बाजारात दाखल झाला आहे. शहरातील नागरीकांनी गावरान सीताफळाला अधीक पसंदी दिल्ली असल्याचे किरकोळ व्यापारी यांनी सागीतले. बाजारपेठेत येणारे गोल्डन सीताफळ हे सोलापुर, पंढरपुर येथून काही प्रमाणात मागवले जाते. तर गावरान सीताफळ हे ग्रामीन भागातून बाजारपेठेत दाखल केले जाते. शहरातील बाजारपेठेत जवळपास १०० ते १५० कॅरेट सीताफळाची आवक होत असल्याचे होलसेल व्यापा-यानी सागीतले आहे.