24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार

गृहमंत्री सपशेल अपयशी : सुप्रिया सुळे

अकोला : अकोल्यातील घटनेने राज्यातील महिला आणि मुली खरेच सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केलेयेत. पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचे मुंडन करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडले आहे. महाराष्ट्राला हादरवणा-या या घटनेबाबत ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी.

राज्य महिला आयोगाकडून घटनेची दखल
अकोल्याची घटना निंदनीय आहे. राज्य महिला आयोगानं याची दखल घेतली असून मी सकाळपासून संबंधित अधिका-यांच्या संपर्कात आहे. तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR