22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी ३५ जागा जिंकणार

महाविकास आघाडी ३५ जागा जिंकणार

गडचिरोली : प्रतिनिधी
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाल्यास राजकीय संन्यास घेणार, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली. राज्यातील ३५ जागांसह विदर्भातील दहावर महाविकास आघाडी विजयी होणार असा विश्वासही व्यक्त केला. गडचिरोली दौ-यावर असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. भाजपच्या भ्रष्ट धोरणांना जनता कंटाळली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने विकासकामांची माहिती दिली नाही. उलट धार्मिक ध्रुवीकरण करून मतदारांची दिशाभूल करण्यात आली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. अशा पद्धतीची टीका आणि प्रक्षोभक वक्तव्य करणा-या पंतप्रधानांवर कारवाई होत नाही. मात्र उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने कारवाईची नोटीस दिली आहे. त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR