23.9 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूरचाकूर येथील पोलिस हवालदार लाच घेताना रंगेहात 

चाकूर येथील पोलिस हवालदार लाच घेताना रंगेहात 

चाकूर : प्रतिनिधी
शेतीच्या बांधावरील झाड तोडल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना चाकूर येथील पोलिस हवालदारास पंचासमक्ष लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या भावकीतील अंगद शिवाजीराव चव्हाण व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या शेतीतील सामायिक बंधा-यावरील झाड तोडल्याच्या कारणावरून भांडण झाले. यानंतर अंगद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तक्रारदार व त्याचे वडील यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गु.र. न. २४५/२०२४  कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनीही अंगद चव्हाण व त्यांच्या नातेवाईकाविरुद्ध गु. र.नं. २४६/२०२४ कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ५०७, ३४ भा.द.वी. प्रमाणे क्रॉस गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपास कामात मदत करून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदारांंना आरोपी पांडुरंग दाडगे नेमणूक पोलिस ठाणे चाकूर व पोलिस उपनिरिक्षक दिलीप रघुत्तम मोरे यांनी २५ हजार रूपयांची लाचेची मागणी केली.
दि४ जून २०२४ रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक दाडगे यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती २० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले त्यास आरोपी मोरे यांनी लाच देण्यास प्रोत्साहन दिले. दि. ६ जून रोजी दाडगे यांनी तहसील कार्यालय चाकूर समोरील मोकळ्या जागेत, गेट नंबर २ च्या रस्त्यावर २० हजार रुपये लाचेची रक्कम शासकीय पंचासमक्ष स्वीकारली. असून आरोपी क्र 1 दाडगे यास सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपी मोरे यास  पोलीस ठाणे चाकूर येथून ताब्यात घेतले असून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास लाचलुचपतचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी: संतोष बर्गे, पोलीस उप अधीक्षक, तपास अधिकारी भास्कर मुल्ली हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR