24.8 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयदहशतवादी पन्नूविरोधात एनआयएने दाखल केला गुन्हा

दहशतवादी पन्नूविरोधात एनआयएने दाखल केला गुन्हा

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशदवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरूच आहे. दरम्यान, एनआयएने सोमवारी (२० नोव्हेंबर) शीख फॉर जस्टिसचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याने एअर इंडियावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. दहशतवादी पन्नूविरुद्ध आयपीसीच्या कलम १२०बी, १५३ए आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलम १०, १३, १६ , १७, १८, १८ ब आणि २० अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पन्नूचा नुकताच एक व्हीडीओ समोर आला होता. त्यात त्याने १९ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना धमकावले होते. एनआयएने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पन्नूने ४ नोव्हेंबर रोजी एक व्हीडीओ जारी केला होता. यामध्ये ते शीखांना १९ नोव्हेंबरपासून एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नका, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असे म्हटले होते. एनआयएने म्हटले आहे की, पन्नू भारतात दहशतवादी घटनांना प्रोत्साहन देण्यासाठी चुकीचे माहिती पसरवत आहे. शीख आणि इतर धार्मिक गटांमध्ये द्वेष वाढवण्याचाही तो सातत्याने प्रयत्न करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR