35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरतरुणाईच्या रोड रेसमुळे सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

तरुणाईच्या रोड रेसमुळे सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

लातूर : विनोद उगिले
जिल्ह्यातील बाईकर्सची स्टंटबाजी काही केल्या कमी होत नाही. दररोज शहरातील प्रमुख मार्गावर जीवघेणी रोड रेस करणारे महाभाग वाहनचालकांचा थरकाप उडवू लागले आहेत. त्यांच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे निष्पाप जीव जाण्याचा धोकाही वाढला असून या बाईकर्सना आता तरी आवरा, अशी आर्जव मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे तर पोलिसांनीही मागील ११ महिन्यांत तब्बल ११ हजार २५३ भरधाव धावणा-या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महाविद्यालयीन परिसरात तसेच विविध ठिकाणी विद्यार्थिनींची छेडछाड करणा-या रोडरोमिओंवर ‘दामिनी’ पथकामार्फत कारवाई होत असली तरी हुल्लडबाजी काही कमी झालेली नाही. बेफाम वेगात दुचाकी, चारचाकी दामटवणा-­या कॉलेजकुमारांच्या जीवघेण्या रोड रेसमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रोड रेसच्या मस्तीत वेगाने दुचाकी दामटवणा-­या युवकांची सर्व सामांन्याबरोबरच वाहनचालकांमध्येही दहशत आहे.

अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणापेक्षा इतर ठिकाणीच मन रमत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. धनदांडग्यांची मुले किमती दुचाकी घेऊन त्याचे प्रदर्शनच करू लागले आहेत. बेफाम दुचाकी चालवून सर्वसामान्य पादचा-याबरोबरच वाहनचालकांमध्ये धडकी भरवण्याचे काम काही टवाळखोर सर्रास करीत आहेत. त्यांच्या या उपद्व्यापांमुळे शहरातून प्रवास करणा-या अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. पोलिसांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, अशी आर्जव मागणी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहनचालक यांच्याकडून केली जात आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस निरीक्षक गणेश कदम यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील भरधाव धावणा-या तब्बल ११ हजार २५३ वाहनधारकांवर कारवाई करीत तब्बल २ कोटी १८ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR