पोहरेगाव : वार्ताहर
यंदा हवामान खात्याने दिलेल्या अचूक अंदाजानुसार पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतक-यांमध्ये यावर्षी पेरणी वेळेवर होईल या आशेने शेतक-याांंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले झाले आहे.
गत दोन वर्षीच्या तुलनेत रेणापूर तालुक्यामध्ये पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे शासनाकडून संबंध रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला होता. शेतक-याकडून नियमाप्रमाणे जूनला पाऊस पडेल या आशेमुळे रखरत्या उन्हातही पेरणीपूर्व मशागतीची कामे केली. शेतक-यांना पावसाची प्रतिक्षा होती. शनिवारी दुपारनंतर पावसाने अचानकपणे साधारण तासभर जोरदार हजेरी लावल्याने शेतक-यासह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
पोहरेगाव परीसातील शेरा, निवाडा, धगा, इटी आदी शिवारात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसाच्या मोठ्या होत्या. अवघ्या तासाभरात नाले ,रस्ते गटारी तुडुंब भरून वाहू लागले. ऐन दुपारच्या वेळी अचानक जोरदार पाऊस झाल्याने विविध कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची घर गाठण्यासाठी मोठी दमछक झाली.