25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeलातूरजळकोट तालुक्यात मेघगर्जनेस जोरदार पाऊस

जळकोट तालुक्यात मेघगर्जनेस जोरदार पाऊस

जळकोट :  प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात सोमवारी दि. १० जून रोजी विविध ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान मेघगर्जनेसह तसेच वादळी वा-यासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
वांजरवाडा परिसरात यापूर्वीही मोठा पाऊस झाला होता. यात सोमवारी जोरदार पाऊस झाला. आणखीन  एक ते दोन पाऊस असाच पाऊस पडल्यास पेरणीला वेग येणार आहे . जळकोट तालुक्यात वांजरवाडा, चेरा, उमरगा रेतू, जगळपूर, होकर्णा, शेलदरा, आदी गावामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, आज दिवसभर उकाडा होता परंतु मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वांजरवाडा परिसरात गारवा निर्माण झाला होता तर दुसरीकडे जळकोट शहरांमध्ये फक्त वारा सुटला होता मात्र पाऊस पडला नाही. दि ९ जून रोजी जळकोट परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR