36.1 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeराष्ट्रीयअरुंधती रॉय यांच्यावर यूएपीए अंतर्गत चालणार खटला

अरुंधती रॉय यांच्यावर यूएपीए अंतर्गत चालणार खटला

नवी दिल्ली : प्रख्यात लेखिका अरुंधती रॉय आणि काश्मीर केंद्रीय विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय कायद्याचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी याला मंजुरी दिली आहे. हे प्रकरण १४ वर्षे जुने असून, अरुंधती यांनी काश्मीरसंदर्भात दिलेल्या भाषणाशी संबंधित आहे. याप्रकरणी सुशील पंडित यांनी एफआयआर दाखल केला होता.

दिल्लीच्या उपराज्यपाल यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आझादी – द ओन्ली वे’ या बॅनरखाली काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रचार करण्यासाठी दिल्लीतील एलटीजी सभागृहात ‘आझादी – द ओन्ली वे’ नावाची परिषद आयोजित करण्यात आली होती.

परिषदेतील वक्तव्यामध्ये सय्यद अली शाह गिलानी, एसएआर गिलानी, अरुंधती रॉय, डॉ. हुसेन आणि माओवादी समर्थक वरावरा राव यांचा समावेश होता. अरुंधती यांच्यावर काश्मीर हा कधीही भारताचा भाग नव्हता आणि तो भारतीय सैन्याने बळजबरीने बळकावला होता असा प्रचार केल्याचा आरोप आहे. या भाषणाचे रेकॉर्डिंगही तक्रारदाराने दिले आहे. २७ नोव्हेंबर २०१० रोजी न्यायालयाने या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे
निर्देश दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR