28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयभाजीपाल्यांसोबत डाळींचे दरही गगनाला

भाजीपाल्यांसोबत डाळींचे दरही गगनाला

महागाईच्या झळा, हरभरा डाळीच्या किमतीत ११ टक्के वाढ, इतर डाळीचे दरही वाढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चालू जून महिन्यात अनेक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे, कांदा, टोमॅटोनंतर डाळींचे भावदेखील वाढले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी दिल्लीत हरभरा डाळीच्या किमतीत ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. त्याचबरोबर तूर आणि उडदाच्या दरातही ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना ऐन पावसाळ््याच्या सुरुवातीला महागाईचा तडका सहन करावा लागत आहे. आधीच भाजीपाल्याचे दर गगनाला मिळाले आहेत. त्यात डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत.

जून महिन्यात डाळींच्या किमतीत वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे, कांदा, टोमॅटोसह डाळींच्या दरात वाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीत हरभरा डाळीच्या दरात ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचबरोबर कांद्याच्या भावात ६७ टक्क्यांनी वाढ झाली. तूर, उडीद, मूग डाळींच्या दरातही वाढ झाली. देशातील बटाटे, कांदा आणि टोमॅटोच्या सरासरी दरांवर नजर टाकली तर सर्वाधिक वाढ टोमॅटोमध्ये झाली. टोमॅटोच्या दरात ३१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचबरोबर हरभरा आणि तुरीच्या दरातही सरासरी २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ३१ मे रोजी हरभरा डाळीची किंमत ८६.१२ रुपये प्रतिकिलो होती. ज्यात २.१३ टक्के म्हणजेच १९ जूनपर्यंत १.८४ रुपयांची वाढ झाली. आज डाळीची किंमत ८७.९६ रुपये झाली आहे. ३१ मे रोजी तूर डाळीची किंमत १५७.२ रुपये प्रतिकिलो होती. त्यात १९ जूनपर्यंत ४.०७ रुपये म्हणजेच २.५८ टक्के वाढ झाली. तूर डाळीचा भाव १६१.२७ रुपये प्रतिकिलो झाला. उडीद डाळीच्या सरासरी दरात फारशी वाढ झालेली नाही. आकडेवारीनुसार ३१ मे रोजी १२५.७९ रुपये किंमत होती. ती वाढून १२६.६९ रुपये प्रतिकिलो झाली आहे. म्हणजेच या कालावधीत ०.९० रुपयांची म्हणजेच ०.७१ टक्के वाढ झाली.

जून महिन्यात मूग डाळीच्या सरासरी दरात किंचित वाढ झाली. ३१ मे रोजी त्याची किंमत ११८.३२ रुपये होती. १९ मेपर्यंत ११९.०४ रुपये प्रतिकिलो झाली. म्हणजेच या कालावधीत किमतीत ०.७२ रुपयांची म्हणजेच ०.६० टक्के वाढ झाली. देशात मसूरच्या सरासरी किमतीत ०.२२ रुपयांनी म्हणजेच ०.२३ टक्के वाढ झाली. त्यामुळे ३१ मे रोजी ९३.९ रुपये असलेली किंमत वाढून ९४.१२ रुपये झाली.

दिल्लीत डाळींचे किती वाढले?
देशाची राजधानी दिल्लीत ३१ मे रोजी हरभरा डाळीची किंमत ८७ रुपये होती, ती १९ जून रोजी ९७ रुपये प्रतिकिलो झाली. या काळात हरभरा डाळीच्या दरात ११ टक्के म्हणजेच १० रुपयांनी वाढ झाली. तूर डाळीच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे २.३१ टक्के म्हणजेच ४ रुपये वाढ झाली. त्यानंतर ३१ मे रोजी दिल्लीत डाळींचा भाव १७३ रुपये प्रतिकिलो होता. १९ जून रोजी वाढून तो १७७ रुपये प्रतिकिलो झाला. उडदाच्या डाळीचा दरही ३.५२ टक्क्यांनी वाढला. ३१ मे रोजी प्रतिकिलोचा भाव १४२ रुपये होता, तो वाढून १४७ रुपये प्रतिकिलो झाला.

टोमॅटो महागले
टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. कांदा आणि बटाट्यापाठोपाठ आता टोमॅटोच्याही दरात वाढ झाल्याने शेतक-यांना फायदा होत आहे. दुसरीकडे ग्राहकांना चांगलीच झळ सोसावी लागत आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यात टोमॅटोचे दर दुपटीने वाढले आहेत. त्याचा परिणाम सध्या जाणवत नसला तरी येत्या काही दिवसांत देशभरात टोमॅटोच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR