27.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeलातूरपावसाची दमदार हजेरी

पावसाची दमदार हजेरी

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. सलग दुस-या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना उभारी मिळाली असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हयात आजपर्यंत १९९. ५ मिली मिटर पाऊसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्हयात दर वर्षी पेक्षा यावर्षी लवकर पाऊस दाखल झाला आहे. जून महिण्याच्या सुरूवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरण्या करण्यासाठी शेतक-यांची लगबग पाहयला मिळत आहे. शेतक-यांनी पेरण्या केल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. तर जिल्हयात अनेक ठिकाणी अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे तेथील शेतकरीही पावसाकडे डोळे लागले होते.
गेल्या आठ दिवसापासून दिवसा ऊन व ढगाळ वातावरण राहत असल्याने पेरलेल्या पिकांसाठी व जलस्त्रोतांना पाणी वाढीसाठी दमदार पावसाची नितात गरज होती.  शनिवारी दिवसभर ऊन व ढगाळ वातावरण  होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शहरासह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच रविवारीही दिवसभर कडक ऊन होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी ५ वाजल्यानंतर हलक्या पावसाच्या सरी लातूर शहरासह परिसरात कोसळल्याने वातावरणात गारवा तयार झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR