28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडागौतम गंभीरने लखनौ संघाची सोडली साथ

गौतम गंभीरने लखनौ संघाची सोडली साथ

नवी दिल्ली : आयपीएलच्या मागील दोन हंगामामध्ये चमकदार कामगिरी करणा-या लखनौ सुपर जायंट्सला आयपीएल २०२४ पूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आधीच संघ सोडला होता. आता मार्गदर्शक गौतम गंभीरनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

स्वत: गंभीरने ट्वीटर वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. आता तो कोलकाता नाईट रायडर्सचा नवा मार्गदर्शक बनला आहे. केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत, तर कर्णधार श्रेयस अय्यर आहे.

आयपीएल २०२३ चा हंगाम संपल्यानंतर गौतम गंभीरने शाहरूख खानची भेट घेतली होती, ज्यानंतर तो आयपीएल संघात सामील होऊ शकतो अशी अटकळ सुरू झाली. केकेआरचे सीईओवेंकी म्हैसूर यांनी आज (बुधवार, २२ नोव्हेंबर) घोषणा केली की, माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर केकेआरमध्ये ‘मार्गदर्शक’ म्हणून काम करणार आहे.

मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासोबत काम करेल. लखनौ सुपर जायंट्सची मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरनेही एक भावनिक संदेश शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हे पद सोडताना खूप भावूक दिसत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR