37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाकर्णधार पांड्याचा गुजरात टायटन्सला रामराम?

कर्णधार पांड्याचा गुजरात टायटन्सला रामराम?

मुंबई : आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांना संघात मोठा बदल दिसू शकतो. भारताचा टी-२० कर्णधार हार्दिक पांड्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग लिलावापूर्वी गुजरात टायटन्सला सोडू शकतो. हार्दिक पांड्या कोणत्या संघात सामील होणार याबाबत आता अहवाल समोर आला आहे.
३० वर्षीय हार्दिक गुजरात टायटन्स सोडून पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील होऊ शकतो. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने या घडामोडीवर भाष्य करण्यास नकार दिला. पण हार्दिक पुन्हा संघात सामील होऊ शकतो अशी अटकळ आहे.

अशा परिस्थितीत २६ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, जेव्हा आयपीएलची ‘ट्रेडिंग विंडो’ बंद होईल. हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून ७ हंगाम खेळला आहे. २०२२ च्या हंगामापूर्वी तो ‘रिलीझ’ झाला होता.

गुजरात टायटन्समध्ये सामील झाल्यानंतर हार्दिक पांड्याने या नवीन आयपीएल संघाला सलग दोनदा टी-२० लीगच्या फायनलमध्ये नेले. यामध्ये गुजरात संघानेही पदार्पणाच्या हंगामात विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्समधील घडामोडींवर लक्ष ठेवणा-या आयपीएलच्या सूत्राने सांगितले, हार्दिकला मुंबई इंडियन्सशी जोडण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे संघात बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र सध्या अधिक काही सांगता येणार नाही. हार्दिकने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR