37.4 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित

पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित

पुणे : जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात यापूर्वी केंद्राच्या निकषानुसार बारामती, पुरंदर हे दोन तालुके पूर्णत: तर इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यांत अंशत: दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुके वगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या ठिकाणी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के कमी पाऊस झाल्याने या गावांना टंचाईसदृश म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR