23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रबुधवारी मंत्रिमंडळ विस्तार?

बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार?

आशिष शेलार, पंकजा मुंडे, राम शिंदे, संजय शिरसाट, संजय कुटे, राणा पाटील यांची नावे चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) गुरूवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी आणि महायुती सरकारच्या शेवटचे अधिवेशन सुरू होत असून त्या पूर्वी गेले वर्षभर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अचानक दिल्लीवारी केली व मंत्रिमंडळ विस्ताराची अनुमती मिळाल्याची चर्चा आहे. येत्या २६ तारखेला अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सकाळी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या शक्यतेला शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील यांनीही दुजोरा दिला आहे. विस्तार झाला पाहिजे, असे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे मत आहे. येत्या दोन दिवसांत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे; पण इच्छुक अधिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत गोपनियता पाळत असावेत, असे शिरसाट यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला फटका बसला आहे. येत्या ३ ते ४ महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक असल्याचा महायुतीतील नेत्यांचा आग्रह आहे. विशेषत: शिंदे आणि अजितदादा गटाला विस्तार हवा आहे. अजित पवार हे त्यांच्या आमदारांसह २ जुलै २०२३ रोजी महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच्या सोबतच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार उरकावा, अशी मागणी सरकार पक्षामधील आमदारांमधून होत आहे. गुरूवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होते आहे. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते आ. संजय शिरसाट यांनीदेखील त्याला दुजोरा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी प्रत्येक पक्षाच्या नेत्याची इच्छा आहे. येत्या दोन दिवसांत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र अनेक आमदार इच्छुक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत गोपनियता बाळगली असल्याचे शिरसाट म्हणाले.

बिघडलेले राजकारण सावरण्याचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागला. राज्यघटना बदलाची चर्चा, अल्पसंख्याक समाजाचे ध्रुवीकरण, आरक्षणाच्या आंदोलनामुळे दुरावलेला कुणबी, मराठा समाज, ओबीसींची नाराजी याचा मोठा फटका बसला. मंत्रिमंडळ विस्तार करताना बिघडलेले राजकारण सावरण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या बरोबरच आशिष शेलार, राम शिंदे, संजय कुटे, राणा जगजितसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहेत. शिंदे गटाकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, रमेश बोरनारे यांची नावं चर्चेत आहेत. अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे व सध्या शरद पवार यांच्या सोबत असलेल्या माजी मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. विस्तार करताना अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना वगळले जाणार, अशी कुजबूज गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR