28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रशालेय पोषण आहाराला लागली कीड

शालेय पोषण आहाराला लागली कीड

पुणे : विद्यार्थ्यांसाठी पुरवठा केला जाणा-या पोषण आहारासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. खराब धान्याचा पुरवठा ही नेहमीचीच ओरड असून आता पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला कीड लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी; यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणारा आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असून यातून नक्की पोषण कुणाचे केले जातेय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणा-या तांदूळ आणि मटकी, मूगडाळ, डाळींना किडे-अळ्यांनी घेरलेय. यावेळी बहुळ ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्यांनी शाळेत येऊन पाहणी देखील केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR