24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयएव्हरेस्टवर कच-याचा ढीग

एव्हरेस्टवर कच-याचा ढीग

काठमांडू : जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवरील सर्वाधिक उंचीवरील कॅम्पजवळ कच-याचा ढीग असून, तो साफ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात. एव्हरेस्ट शिखराजवळील कचरा साफ करणे आणि वर्षानुवर्षे गोठलेल्या अवस्थेतील मृतदेह खणून काढण्याचे काम करणा-या एका पथकाचा प्रमुख असलेल्या शेर्पाने ही माहिती दिली.

नेपाळ सरकारने निधी दिलेल्या आणि सैनिक व शेर्पांचा समावेश असलेल्या एका पथकाने ११ टन कचरा, चार मृतदेह आणि एक सांगाडा एव्हरेस्ट परिसरातून उचलला. अंग बाबू शेर्पा यांनी या पथकाचे नेतृत्व केले. एव्हरेस्ट शिखरावर चढाईसाठी शेवटचा कॅम्प असलेल्या साउथ कोल या परिसरात अजूनही ५० ते ५० टन कचरा असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘कच-यामध्ये प्रामुख्याने जुने तंबू, अन्नाची पाकिटे, गॅस कार्ट्रिज, ऑक्सिजन बाटल्या, चढाई आणि तंबू उभारणीसीठी वापरले जाणारे दोर यांचा समावेश आहे. हा कचरा आठ हजार मीटर उंचीवर साउथ कोल कॅम्पच्या जवळ अनेक थरांमध्ये गोठलेल्या स्वरूपात आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR