लातूर : प्रतिनिधी
जून पासून आज पर्यंत ताप येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी होणे आदी आजारामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे रक्त नमुने आरोग्य विभागाने लॅब मध्ये तपासले असता गेल्या ४२ दिवसात १२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हयात गेल्या सव्वा महिण्यापासून जिल्हयात डेग्यूच्या रूग्णांचे प्रमाण अधिक वाढले आहे. हि लातूर जिल्हयासाठी चिंतेची बाब आहे.
लातूर जिल्हयात पावसाळयात साचत आसलेल्या पाण्याचा निचरा न होणे, पाणी साठून राहणे आदी कारणामुळे डासांची वाढ झाली आहे. साठलेल्या पाण्यात वाढलेल्या डास नागरीकांना चावत असल्याने नागरीक, ताप, डोकेदुखी आदी आजारांना बळी पडत असल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल होत आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे संशयीत म्हणून रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. सदर नमुने हे नांदेड येथील सेंटनल लॅबला तपासण्यासाठी पाठवण्यात येत आहेत. जानेवारी ते आज पर्यंत जे ताप येणे, ठंडी वाजणे, डोके दुखणे आदी रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. अशा रूग्णांचे डेंग्यू संशयीत म्हणून ५३९ रक्त नमुने तपासणीसाठी घेऊन ते लॅबला आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १४७ जणांचे नमुने हे डेंग्यू पॉझीटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या ४२ दिवसात जूनपासून १४७ जणांचे रक्त नमुने हे डेग्यू पॉझीटीव्ह आले आहेत.