23.6 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeराष्ट्रीयबस-ट्रकच्या अपघातात ५ ठार, ८ जण जखमी

बस-ट्रकच्या अपघातात ५ ठार, ८ जण जखमी

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर जोरदार धडक

आणंद : अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर आणंदजवळ ट्रक आणि लक्झरी बसमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी आणंदच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रहून राजस्थानला जाणारी लक्झरी बस आज पहाटे साडेचारच्या सुमारास पंक्चर झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी होती. चालक, क्लिनर आणि प्रवासी बसखाली उभे होते.

दरम्यान, मागून येणा-या ट्रकने बसला जारदार धडक दिल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पेट्रोलिंग पथक, आनंद अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून, जखमंवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी पैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR