25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरमाऊली शैक्षणिक संकुलाची लक्षवेधी आषाढी दिंडी 

माऊली शैक्षणिक संकुलाची लक्षवेधी आषाढी दिंडी 

लातूर : प्रतिनिधी
अंबाजोगाई रोडवरील उपक्रमशील शैक्षणिक केंद्र म्हणून परिचित असलेल्या माऊली विद्यार्थी विकास केंद्र,
माऊली बालक मंदिर, (सेमी इंग्लिश) माऊली इंटरनॅशनल मॉडेल  स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दि. १६ जुलै  रोजी आषाढी दिंडी काढली.  पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय. त्या परंपरेची संस्काराची जाणीव व महत्त्व बालवयापासून होण्यासाठी दरवर्षी विद्यालयात आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात येते.
या दिंडीत वारक-यांच्या वेशभूषेत चिमुकले विद्यार्थी पालकांसमवेत सहभागी झाले होते. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’चा जयघोष प्रत्येकाच्या मुखी होता. टाळ मृदंगाची मंजूळ ध्वनी सर्वांच्या कानावर पडत होती. या ंिदडीमध्ये सर्वजण मंत्रमुग्ध होऊन चालत होते.  या नयनरम्य सोहळयामध्ये नागरगोजे आनंदी, गाडेकर वेदांत यांनी विठ्ठल, रुक्मिणीची तर मदने श्लोक व बर्गे संस्कार यांनी तुकाराम व संत ज्ञानेश्वराच्या वेशभूषा साकारल्या
होत्या.
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, या भक्तीमय गीतावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक व बहारदार असे नृत्य सादर करत सर्व उपस्थितांची मने जिंकली. घरापुढे ंिदडी आल्यानंतर परिसरातील महिला भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा करून पालखीचे दर्शन घेतले.  ंिदडी ची सांगता वारकरी भजनी मंडळाच्या हस्ते विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आली व त्यानंतर सर्व उपस्थितांना  प्रसाद वाटपही करण्यात आले.
या दिंडीमध्ये संस्था सचिव गंगाधर आरडले, कोषाध्यक्ष तानाजी बेवनाळे पाटील, प्राचार्या कविता आरडले, उपप्राचार्या काळे भाग्यश्री, व संपूर्ण शिक्षक वृंद, कर्मचारी पालक,  विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी
झाले होते. दिंडीच्या यशस्वीतते साठी  सर्व कॅप्टन्स व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR