33.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeक्रीडायुवराज सिंह आयपीएलमध्ये परतणार?

युवराज सिंह आयपीएलमध्ये परतणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएल २०२५ मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी फ्रेंचायझी सोडू शकतात. आता गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी युवराज सिंहचा पर्याय म्हणून विचार केला जात असल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे.
मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, गुजरात टायटन्समध्ये अनेक बदल शक्य आहेत. आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी बहुधा संघ सोडणार असून मुख्य प्रशिक्षकपदासाठी युवराज सिंहच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. गुजरात संघाच्या सध्याच्या कोचिंग स्टाफमध्ये आशिष कपूर, नईम अमीन, नरेंद्र नेगी आणि मिथुन मन्हास यांचाही समावेश आहे. दरम्यान २०१९ मध्ये आयपीएलमध्ये युवराज खेळाडू म्हणून शेवटचा सामना खेळला होता.

देशातील दोन सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात आता थेट आयपीएलच्या मैदानातही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अदानी समूह आयपीएलमधील फ्रेंचायझी गुजरात टायटन्समधील भागभांडवल खरेदी करण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR