जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत मी दिलेल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन समाजाला केले आहे.
गेली १३, १४ वर्षे काही झाले नाही मग माझ्यावरच आता कारवाई का? मी गोरगरिबांसाठी लढतोय म्हणून? पुण्यात जाऊन मी जामीन घेऊन आलो, आता नोटीस नाही, डायरेक्ट वॉरंट, का घडवून आणतात हे? असे प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारले. मला बदनाम करण्यासाठी हे चालले आहे. मला आधीही कुठलीही नोटीस आली नाही. हे फडणवीस साहेबांना शोभत नाही. आमचे अभियान बदनाम करू नका. तुम्ही गोडीगुलाबीने हाताळले तर तुमच्या अंगलट येणार नाही, असे ते म्हणाले.
उपोषण सुरू असताना तिथे बसून काम होत नव्हते आता इथे बसून काम होईल, मी कामाला लागलोय.. सरकार ऐकायला तयार नाही, लोक ऐकत नाही, मी याआधीही सलाईन काढून टाकले पण वेळ जातो आणि काम करायचे होते.
सरकारवर विश्वास नाही असा शब्द मी वापरणार नाही आणि नवी डेडलाईन त्यांनी मागितली होती म्हणून १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिल्याचे जरांगे म्हणाले. मी रात्री बरेच उमेदवार निवडले. निवडणुकीचे काम सुरू केल्याचे जरांगेंनी सांगितले.