24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeलातूरघरणीच्या पुलावरून पाणी; वाहतूक ठप्प

घरणीच्या पुलावरून पाणी; वाहतूक ठप्प

नळेगाव: वार्ताहर
चाकुर तालुक्यातील गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नळेगाव येथील लातूर-उदगीर महामार्गावरील घरणी पुलावरून पाणी जात असल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घरणी नदीवरील काही दिवसापासून नवीन पुलाचे काम सुरू आहे. यामुळे कंत्राटदाराकडून घाईगडबडीने पावसाळ्याचा विचार न करता नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी जुना असलेला पुल पाडून टाकला. यानंतर नागरिकांना ये जा करण्यासाठी तसेच वाहनांसाठी पुलाच्या बाजूलाच पाईप टाकून कच्चा पर्यायी रस्ता करण्यात आला होता.परंतु पर्यायी रस्ता करताना या ठिकाणी पर्यायी रस्ता टिकेल का नाही याचा अभ्यास करण्यात आला नाही. कांही दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे पुल वाहून गेला होता परंतु त्यानंतर पर्यायी रस्त्यावरून सकाळ पासून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
लातूर – उदगीर महामार्गावरील नळेगाव येथील घरणी पुलावरून जात जात असल्याचे कळताच तहसीलदार नरंिसग जाधव,तलाठी प्रश्नांत तेरकर आणि कोतवाल सदानंद शिरसागर यांनी पाहणी केली. नळेगावहून उदगीरकडे जाण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे तहसीलदार नरंिसंग जाधव यांनी कळविले आहे.यावेळी त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून उदगीर कडे जाण्यासाठी लातूर,चाकुर,उजळंब ,कबन सांगवी, उदगीर रस्ता येरोळ मोड,रोहिना ,हेर, कुमठा , तोंडार मार्गे उदगीर,लातूर रोड – सावरगाव- भाट सांगवी- अजोंनसोंडा – उदगीर तसेच शिरूर अनंतपाळ मार्गेही लातूर ते उदगीर वाहतुकीचा पर्यायी रस्ता सुरु करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR