17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीय‘एच ९ एन २’ चा भारताला कमी धोका!

‘एच ९ एन २’ चा भारताला कमी धोका!

आरोग्य मंत्रालयाची स्पष्टोक्ती चीनमधल्या नवीन व्हायरसने भीती वाढविली

नवी दिल्ली : चीनच्या उत्तर भागात नव्याने आढळून येत असलेल्या एच ९ एन २ व्हायरसची प्रकरणे आणि श्वसनाच्या आजारासंबंधी झालेल्या उद्रेकावर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत शुक्रवारी स्पष्टीकरण दिले.

आरोग्य मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, चीनमधून नोंदवलेले एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणे आणि श्वासोच्छवासाच्या आजारांचा भारतात कमी धोका आहे. उत्तर चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वासोच्छवासाच्या आजारामध्ये वाढ होत असल्याचे मीडिया रिपोर्टनुसार लक्षात येत आहे. चीनमधील एच ९ एन २ संबंधी जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने दखल घेतली आहे. या आजाराची मानसाला होत असलेली लागण आणि मृत्यूदर दोन्ही रेशो कमी आहेत. भारताच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केलं की, भारत सध्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. विशेषत: कोरोनानंतर देशाने आरोग्यविषयक पायाभूत सुविधा सज्ज केलेल्या आहेत.

श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ
चीनमध्ये नव्याने श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जगासमोर नवीनच भीतीचे संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणू चीनमधूनच आल्याचे सांगितले जात होते. आता लहान मुलांमध्ये पसरणारा श्वसनाचा आजार चीनमध्ये बळावत आहे. त्यामुळे इतर देश धास्तावले असून जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याची दखल घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR