22.7 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeपरभणीआरक्षणाचे वर्गीकरण हे कलम १४ चे उल्लंघन

आरक्षणाचे वर्गीकरण हे कलम १४ चे उल्लंघन

परभणी : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या संदर्भाने आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिला. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाचे वर्गीकरण हे कलम १४ चे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.

आरक्षणाचे लाभार्थी हे केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय नसून जनरल कोट्यातील लोकही आहेत. जर फक्त अनुसूचित जाती श्रेणी (ऐतिहासिकदृष्ट्या वंचित) वर्गीकृत केली गेली असेल, तर ते समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करते आणि घटनेच्या कलम १४ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला न्याय देत नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

अनुसूचित जातींमधील विविध जातींच्या मागासलेपणाचे मोजमाप करण्याच्या मापदंडांवर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मौन बाळगले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने (६ विरुद्ध १) अनुसूचित जातीच्या उप-वर्गीकरणाला परवानगी दिली आहे. या साध्या कारणास्तव हा निकाल कलम १४ च्या विरुद्ध आहे, असे मत मांडले असले तरीही ई. व्ही. चिन्नय्या यांनी आपले मत मांडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR