परभणी : सामुदायिक विज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एक विद्यार्थी एक वृक्ष तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी एक लक्ष वृक्ष लागवड उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कृषी विद्यापीठ संलग्नित सर्व कार्यालयासाठी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी एक लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असून यावर्षी वनामकृवि परभणी अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सदर वृक्ष लागवडीसाठी बदाम, कडूलिंब, बांबू शेवगा,आंबा, मोह्गणी, जांभूळ, मोहा, बेहेडा, सागवान, चिंच इत्यादी झाडांची रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत पुरविण्यात येत आहेत.
या वेळी डॉ. जया बंगाळे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ वृक्ष लागवड न करता त्याचे योग्य रितीने संगोपन करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन डॉ. विद्यानंद मनवर रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. जयश्री रोडगे, डॉ.सुनिता काळे, डॉ.विजया पवार डॉ.वीणा भालेराव, प्रा. प्रियांका स्वामी, प्रा.मानसी बभूळगावकर, प्रा. स्वाती गायकवाड, प्रा.आश्विनी बेद्रे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने पर्यावरण संवर्धनाबाबत घोषणा देत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश शिंदे, शेख गौस, राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.