22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्य‘एड्स’मुक्त करणारी लस आता अस्तित्वात

‘एड्स’मुक्त करणारी लस आता अस्तित्वात

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
जगभरातील एचआयव्ही ग्रस्तांसाठी महत्वाची बातमी आहे. जर वर्षांतून दोनदा हे इंजेक्शन घेतले तर त्याचा बचाव होणार असल्याचे म्हटले जात आहे. संशोधकांनी महिलांवर प्रयोग केले आहेत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये या संदर्भात संशोधन प्रकाशित झाले आहे.

एड्सवरील हे औषध संशोधकांनी शोधून काढले असून त्याचा इंजेक्शनमधून दोन डोस वर्षाला दिल्यानंतर एचआयव्ही प्रतिबंधक औषधाने महिलांमध्ये १०० टक्के रिझल्ट चांगले आले आहेत. तसेच त्यांच्या आरोग्यावर देखील कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. वर्षातून दोनदा घ्यावा लागणा-या या व्हॅक्सीनचे नाव लेनकापाविर असे आहे. अमेरिकेतील बायोफार्मास्युटिकल कंपनी जीलेड सायसेन्स यांच्यावतीने प्री-एक्सपोझर प्रोफिलॅक्सिस मेडिसिन म्हणून या औषधाला विकसित केले आहे. हे औषध एचआयव्हीचा वाहक नसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तीत संक्रमण रोखण्याचे काम करते.

या लसीची चाचणी करण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि युगांडा येथील किशोरवयीन मुली आणि तरुण महिलांना सामील करण्यात आले होते. ज्यांना आपल्या पार्टनरकडून या आजाराचा धोका आहे, त्यांच्यावर देखील या औषधाचा चांगला परिणाम होईल असे म्हटले जात आहे. एचआयव्ही किंवा ुमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून निघणा-या स्रावाद्वारे दुस-याच्या शरीरात जातो. वेळीच उपचार न झाल्यास हा संसर्ग एड्समध्ये परिवर्तित होऊ शकतो किंवा वर्षानुवर्षे इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम अवस्थेला निर्माण करु शकतो.

चाचणीत एचआयव्ही-नेगेटिव्ह होते अशा ५,३३८ उमेदवारांना यासाठी सामील केले गेले. त्यांची तीन गटात विभागणी केली. यातील पहिल्या २,१३४ जणांच्या गटाला २६ आठवड्याच्या अंतरानंतर लेनकापाविर इंजेक्शन दिले गेले. दुस-या २,१३६ जणांच्या गटास रोज डेस्कोवी (एफ/टीएएफ) गोळी देण्यात आली. तिस-या १,०६८ जणांच्या गटाला प्रति दिन ट्रुवाडा (एफ/टीडीएफ) ही गोळी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन यूनिव्हर्सिटीच्या डेसमंड टूटू एचआयव्ही सेंटर यांच्या सहकार्याने संशोधकांनी केलेल्या संशोधकांना एकूण ५५ संक्रमण आढळले. लेनकापाविर दिलेल्या गटात शून्य संग्रह, डेसोवी गटात ३९ आणि ट्रुवाडा गटाच १६ संक्रमण आढळले. या अभ्यासातून वर्षातून दोनदा लेनकापाविर इंजेक्शन घेणा-या व्यक्तीला कोणतेही एचआयव्ही संक्रमण झाले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR