24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी

मुंबईत ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी

मुंबई : मुंबईत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

विवाह समारंभ, अन्त्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संघटना यांच्या बैठका यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणा-या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR