20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती

भुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती

नागपूर : ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेने प्रश्न निर्माण झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना समज दिली असेलच. एकीकडे राज्य सरकार आपली स्पष्ट भूमिका मांडत आहे. दुसरीकडे भुजबळ यांच्याकडून वादळ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत.
खरेतर त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कुठलाही धोरणात्मक निर्णय होण्यापूर्वी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बरोबर नाही. विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका असली तरी शासनही कटिबद्ध आहे. आरक्षण देण्यासंदर्भात युद्धपातळीवर काम सुरू आहे. मनोज जरांगे यांना २ जानेवारीपर्यंत लेखी आश्वासन दिले आहे. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या प्रकरणी गंभीर आहेत. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही.

मोडी लिपीतून मराठा-कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अहमदनगर, पुणे जिल्ह्यात लोक उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी मोडी लिपीचे अभ्यासक उपलब्ध नसतील, तर जिल्हाधिका-यांनी संपर्क केल्यास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. काही ठिकाणी अडचणी आहेत. पण कार्यवाही सुरू आहे. मुळात आरक्षण देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय झाला का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR