सोलापूर : सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने व सोलापूर जिल्हा स्क्वॅश असोसिएशन यांच्या सहकार्याने शालेय शहरस्तर स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा स्क्वॅश संघटनेचे जिल्हाध्यक्ष केतन शहा यांच्या शुभहस्ते व् सोमपा क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,अध्यक्षीय भाषणात केतन शहा यांनी सांगितले सोलापूर मध्ये अजून स्क्वॅश कोर्टची आवश्यकता आहे.
जिल्हा नियोजन समिती मधून ह्या खेळा साठी पैश्याची तरतूद करावी म्हणून जिल्हाधिकारी व खासदार यांना देखील पत्र दिले आहे.हा खेळ ऑलिपीक मध्ये सुद्धा खेळला जातो व विदयार्थ्यांना देखील ५ मार्क मोजले जातात.या स्पर्धेसाठी शहरातील २२ मुलींनी व ३६ मुलांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेसाठी पंच म्हणून मितेश काळे यांनी काम पाहिले या कार्यक्रमासाठी वीरेश अंगडी, राजाराम शितोळे, सुहास छंचुरे अजित पाटील, शिवानंद सुतार, प्रसन्न काटकर रविकांत म्हमाणे, नागेश खुने हे उपस्थित होते.