पुणे : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा आदी राज्यांमध्ये निवडणुका लढवल्यानंतर भारतीय स्वदेशी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास सज्ज झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम गुप्ता, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सम्राट कर्वा यांनी पत्रकार परिषदेत माहिती सांगितली.
महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षांची खिचडी झाली आहे; त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून महाराष्ट्रात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या पक्षाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळेल. शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने पक्ष लक्ष देणार आहे याशिवाय महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष प्रयत्न करेल.
प्रत्येक गावातील शेवटच्या व्यक्तीला योग्य रोजगार, व्यवसाय, शिक्षण सुविधा, स्वदेशी व्यवसायासह तसेच आनंदी, निरोगी, न्यायसंगत आणि सुरक्षित जीवन जगता येईल. भारताच्या संविधानानुसार स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आगामी सत्रांमध्ये आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आम्ही कोणत्या प्रक्रिया आणि पद्धती अवलंबतो याची माहिती यावेळी सांगितली.